*नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार*
अहमदनगर मुदत संपणार्या जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतची प्रभाग रचना मार्च महिन्यांत जाहीर करण्यात आली होती. आता प्रभाग रचनेनुसार प्रारून मतदार यादी १० ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर १० ते २१ ऑगस्टपर्यंत हरकती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर या १८८ ग्रामपंचायतींसाठी २५ ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुदत संपणार्या ७८ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त आहेत. त्यानंतर मुदत संपणार्या १८८ ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम मार्च महिन्यांत पूर्ण करण्यात आला होता. दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षभरात मुदत १९५ ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश*
समोचित आयोगाच्या सूचनानुसार सात ग्रामपंचायतीचे आरक्षण अपूर्ण आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने उर्वरित १८८ ग्रामपंचायतची प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. आता मुदत संपणार्या या १८८ ग्रामपंचायतींचा मतदार यादी कार्यक्रम सुरू आहे.