नेवासा प्रतिनिधी.नेवासा बुद्रुक महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांसाठी नेवासा बुद्रुक हनुमान मंदिरामध्ये शिधापत्रिकाधारकांचा नुकताच मेळावा घेण्यात आला
या मेळाव्यामध्ये नेवासा तालुका पुरवठा निरीक्षक श्री सुदर्शन दुर्योधन साहेब, यांनी रेशन कार्ड आतील नाव वाढविणे नाव कमी करणे व सर्वांची केवायसी करणे याबाबत मार्गदर्शन केले
यावेळी सहाय्यक पुरवठा निरीक्षक श्री पवन सिंग विघोत,
मंडलाधिकारी बी.बी माने, राजेंद्र देसाई
श्री गणेश घोरपडे बळी भाऊसाहेब,सोपानराव गायकवाड महसूल अधिकारी, श्री ज्ञानेश्वर जरे तलाठी सुरेगाव गंगा शुभम सुरडे अंबादास लष्करे शेख रवींद्र पवार अमोल कचरे, धान्य दुकानदार श्री सचिन देवरे बाळासाहेब जायगुडे, बाळासाहेब गारुळे कचरू डिके नंदराज शिंदे शांताराम गायके, नितीन लबडे रमेश लोखंडे व रेशन कार्डधारक श्री सागर सोनटक्के, किशोर गावडे दत्तात्रय क्षीरसागर बंडू गावडे वत्सलाबाई पंडित नरोडे, नाथाभाऊ शिंदे
*नेवासा बु. महसूल मंडळांतर्गत गावातील रेशनकार्ड धारकांच्या असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार दि. ११/०८/२०२५ रोजी नेवासा बुद्रुक येथील मारोती मंदिरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.*
*तसेच या ठिकाणी रेशनकार्ड धारकांची ई-केवायसी करण्याची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली रेशनकार्ड धारकांचे प्रश्न प्रलंबित त्यांनी स्वतः रेशनकार्ड व इतर कागदपत्रांसह हजर होते रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे नाव वगळणे नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड आतील नावे ऑनलाईन करणे इत्यादी कामे या मेळाव्यातून करण्यात आली
रेशन कार्ड संदर्भात नागरिकांच्या खूप अडचणी आहेत याबाबत तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी विशेष दखल घेऊन पुरवठा अधिकाऱ्यांना प्रत्येक मंडळामध्ये मिळावे घेऊन रेशन कार्ड केवायसी करून घेणे सक्तीचे केले आहे
त्यामुळे यापुढे अन्नधान्य उपलब्ध होण्यावर त्याचा परिणाम होणार आहे