राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या हस्ते नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय व शाखेचे भव्य उदघाटन*



*राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या हस्ते नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय व शाखेचे भव्य उदघाटन*

*नेवासा : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखेचे भव्य उदघाटन. रविवार 8 जून रोजी राष्ट्रवादी शाखा उदघाटन, संपर्क कार्यालय उदघाट्न, राष्ट्रवादी सदस्य नोंदणी अभियान, महाराष्ट्र घरेलू कामगार महिला योजना नोंदणी या प्रसंगी शुभारंभ करण्यात आले.*
   राष्ट्रवादी काँग्रेस नेवासा तालुका अध्यक्ष अशोक मोरे नेते वसंतराव कांगुणे आणि गणेश चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी बेलपिंपळगाव शाखा स्थापन करण्यात आली. शाखेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र धिरडे, उप अध्यक्ष दिलीप लंघे, सचिव रवींद्र गटकळ, सरचिटणीस अनिल पुंड,सदस्य बाबासाहेब भांड, विश्वनाथ कांगुणे, दत्तात्रय पुंड आदी सक्रिय कार्यकर्ते यांनी अजितदादा पवार यांचे हाथ बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे.
   बेलपिंपळगावकर यांच्या वतीने अब्दुल भैय्या शेख यांचे तोफेची सलामी देत भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या सोबत कामगार आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मकरंद राजहंस, नेवासा तालुका अध्यक्ष अशोक मोरे, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप लष्करे, धनूभाऊ कणगरे,कामगार नेते भारत चौगुले, युवक काँग्रेस राहुल कांगुणे, भावी सरपंच किशोर गारुळे, माजी उप सरपंच बंडूपंत चौगुले, दत्तात्रय राऊत मुमताज भाई शेख, सरपंच कृष्णा शिंदे, अनिल पुंड, गणेश गारुळे, सुनील शिरसाठ, महेश आघाडे आदी उपस्तित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन गणेश चौगुले सर यांनी केले. अध्यक्ष स्थानी बाबासाहेब भांड होते. वसंतराव कांगुणे आणि कार्लस साठे सर यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस नेवासा तालुक्याचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्त्यांचा आणि पालकांचा सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी वसंतराव कांगुणे यांनी आभार मानले.

चौकट - सन्मानीय अजित दादांच्या नेतृत्वात 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गावं तिथे राष्ट्रवादी उपक्रम राबवणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीने सर्व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळुन देण्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकदीने उभा राहील.अब्दुल भैय्या शेख 

युवा नेते अब्दुल भैय्या शेख.
चौकट 2
अब्दुल भैय्या शेख यांच्या नेतृत्वात नेवासा तालुका गावं तिथे राष्ट्रवादी हा उपक्रम राबवणार असून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळुन देऊ.
अशोक मोरे 
तालुका अध्यक्ष 
नेवासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.