नेवासा काँग्रेस शिष्टमंडळाची नविन एसपी सोमनाथ घार्गे यांच्याशी भेट; ‘नेहरू विचारवाद’ ग्रंथ देत सन्मान



नेवासा काँग्रेस शिष्टमंडळाची नविन एसपी सोमनाथ घार्गे यांच्याशी भेट; ‘नेहरू विचारवाद’ ग्रंथ देत सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज अहिल्यानगर येथे काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने नविन पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे (भा.पो.से.) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेसतर्फे एसपी साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना गुलदस्ता व 'नेहरू विचारवाद' हा ग्रंथ भेट देण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष मा. संभाजी माळवदे, नेवासा काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, बहुजन समाज पार्टीचे युवा नेते हरीश चक्रनारायण आदी मान्यवरांसह तालुक्यातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नेवासा तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था, युवकांसाठी रोजगार, स्थानिक गुन्हेगारी आणि पोलिसांशी नागरिकांचा संवाद अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. एसपी घार्गे यांनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आवश्यक ती कारवाई आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

ही भेट परस्पर संवाद व सहकार्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात काँग्रेस पक्ष यापुढेही सक्रिय राहील, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.