आदर्श विद्या मंदिर, सोनई शाळेचा निकाल ८७.३६% – गुणवंत विद्यार्थ्यांचा यशस्वी ठसा
खरवंडी (दि. १३): नेवासा तालुक्यातील सोनई येथील आदर्श विद्या मंदिर शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ८७.३६% लागला असून, यावर्षीचा निकाल समाधानकारक ठरला आहे. एकूण ९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग घेतला होता, त्यापैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १२ विद्यार्थी नापास झाले.
शाळेने यंदाही गुणवत्तेची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावर्षी प्रथम पाच क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:
- शिंदे तन्मय नारायण – ८९.८०%
- गोसावी गौरी किशोर – ८७.८०%
- काळे श्वेता गणेश – ८६.००%
- तांदळे नुतन नामदेव – ८२.८०%
- घावटे समर्थ अशोक – ८१.४०%
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळेचे सचिव रविराज पाटील गडाख, अध्यक्षा जयश्रीताई गडाख, मुख्याध्यापक खेस माळसकर सर, वर्गशिक्षक दराडे सर, दरंदले सर तसेच संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
शाळेच्या यशामध्ये विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. यापुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.