*नेवासा शहरास पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करा*
*नेवासा शहर काँग्रेसची नगरपंचायतकडे मागणी*
(नेवासा प्रतिनिधी)- नेवासा शहरासाठी तातडीने टँकर सुरु करण्याची मागणी शहर काँग्रेसने नगरपंचायतकडे केली.
ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात नेवासा शहरास पिण्याच्या पाण्याची मोठी उणीव भासत आहे.शहरातील अहिल्यानगर सारख्या प्रभागात सात ते आठ दिवसातून एकदाच तेही अर्धा तास पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना खाजगी टँकर घेऊन पैसे मोजावे लागत आहे, नेवासा नगरपंचायतकडे विचारणा केल्यास नगरपंचायतसाठी पाणी साठविण्यासाठी ज्या क्षमतेची स्टोअर टाकी हवी ती नसल्यामुळे मुकिंदपूर ग्रामपंचायतकडून पाणी घेऊन ते पाणी शहराच्या काही भागास पुरवून पूर्तता करत आहोत तसेच वीज नेहमी जात असल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे असे उत्तर दिले जाते. मुळातच पाण्याच्या बाबतीत नगरपंचायतचे योग्य नियोजन नाही, पाणी पट्ट्या भरमसाठ दिल्या पण पाणी देत नाही अशी चर्चा नागरीक करतात. नेवासा शहर काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांची दखल घेत आज नगरपंचायतमध्ये जाऊन शहरासाठी टँकर सुरु करण्याची मागणी केली. यावेळी तातडीने टँकर सुरु न केल्यास शहर काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल असा इशारा दिला. असे लेखी निवेदन देखील यावेळी देण्यात आले. निवेदनावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, शहराध्यक्ष अंजुम पटेल,शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण, स्वाभिमानी संघांचे गणपत मोरे, गुलाब पठाण, संजय होडगर आदीसह शहरातील नागरिक उपस्थित होते.