दहावीचा रिझल्ट आला... राज्याचा निकाल 94.10 टक्के



 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10 वी (दहावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. Maharashtra SSC Result Announce पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10 वी (दहावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत 10 दिवस लवकर घेतल्या. निकालही 15 मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी 23 हजार 492 माध्यमिक शाळांतून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख 64 हजार 120 मुले, तर सात लाख 47 हजार 471 मुली आहेत. त्याचप्रमाणे 19 तृतीयपंथीयांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.advertisementराज्याच्या निकाल किती?राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागात 98.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूर विभागात 90.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.