मक्तापूर येथील 24 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता
नेवासा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद, शोध सुरू
नेवासा प्रतिनिधी. नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील कोमल हंसराज लव्हाळे (वय 24 वर्षे) ही विवाहित महिला 11 मे रोजीपासून बेपत्ता असून, यासंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पती हंसराज (वय 30 वर्षे) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी सकाळी ते बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी सुमारे 7 वाजता घरी परतल्यावर त्यांची पत्नी कोमल ही घरात दिसून आली नाही. नातेवाईक व शेजाऱ्यांकडे चौकशी करूनही ती सापडली नाही. अखेर त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
कोमल हिचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :
वय : 24 वर्षे
रंग : गोरा
उंची : अंदाजे 4.5 फूट
शरीरयष्टी : सडपातळ
नाक : सरळ
अंगात पंजाबी ड्रेस
गळ्यात मंगळसूत्र
पायात निळ्या रंगाचे सॅण्डल
याप्रकरणी नेवासा पोलिसांनी तसेच नातेवाईकांनी
नेवासा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, कोमल हिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.