इमामपूर येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पाचेगाव नेवासा(प्रतिनिधी) – इमामपूर परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव गणेश शिवाजी काळे (वय ४५) असे आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे हे सायंकाळच्या वेळेस शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य खबरदारी घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.