उस्थळ दुमाला गावात बिबट्याचे दर्शन, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
उस्थळ दुमाला, १६ डिसेंबर – आज रात्री सुमारे दहा वाजता उस्थळ दुमाला गावातील गायके वस्ती रोडवर गायके यांच्या ट्रॅक्टर समोर अचानक बिबट्याचे दर्शन झाले. गायके हे त्यांच्या वस्तीकडे जात असताना त्यांनी बिबट्याला रस्त्यावर दिसले.
या घटनेनंतर गायके यांनी महाराष्ट्र न्यूज प्रिन्स च्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, "बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अधिक जागरूक आणि सावध राहणे आवश्यक आहे. रात्री घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहा."
गायके यांनी अद्याप कोणालाही अधिकृतपणे माहिती दिली नाही, मात्र त्यांनी या घटनेची माहिती फोनद्वारे महाराष्ट्र न्यूज प्रिन्सला दिली आणि नागरिकांना सूचना देण्यासाठी माध्यमाच्या माध्यमातून कळविण्याची मागणी केली.
या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांना वनविभाग किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्याचे आवाहन केले आहे.