कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न*


*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न*
*कृषि विज्ञान केंद्र दहीगाव - ने येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षणात जैविक व अजैविक ताण संशोधन केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण व डॉ. रवी कुमार यांची भेट*

मधमाशी ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पृथ्वीवरील जवळ जवळ ८७ टक्के वनस्पतीचे परागीभवन मधमाश्या द्वारे होते, सम्पूर्ण मानव जात मधमाश्यांनी परागीभवन केलेल्या व त्यापासून उत्पन्न झालेल्या अन्नावर अवलंबून आहे. या बाबीचे महत्व लक्षात घेऊन श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या वतीने दिनांक ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण युवकासाठी मधुमक्षिका पालन या विषयी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब, मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब, सचिव श्री. अनिल शेवाळे, सहसचिव इंजी. रवींद्र मोटे यांचे मोलाचे मार्गदर्श लाभले. ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या दूरदृष्टीतून दहिगाव ने येथे कृषि विज्ञान केंद्राची उभारणी झाली. हे केंद्र शेतकऱ्यांच्या पर्यंत नवीन शेती तंत्रज्ञान पोहच वण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या केंद्रामार्फत शेतकरी, महिला, बेरोजगार ग्रामीण तरुण यांचेसाठी शेतीपूरक व्यवसाय व उद्योग अभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन सातत्याने करत असते, त्याचाच एक भाग म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाया सबंधीची माहिती ग्रामीण युवकांना व्हावी या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 
सदर प्रशिक्षणा दरम्यान महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञ व प्राध्यापक डॉ. लांडगे एस.ए. यांनी मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक बाबी, चांगल्या मधमाशांची निवड इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. तसेच श्रीरामपूर येथील डॉ.औताडे यांनी मधुमक्षिका पालन उद्योगात माधुमक्षीकाची हाताळणी कशी करावी, आपत्कालीन परिस्थितीत मध माश्या वसाहती कश्या टिकवाव्यात, इत्यादी बाबतीत मार्गदर्शन केले. कोल्हापूर येथील मधुमक्षिका व्यवसाईक श्री. राहुल देओल यांनी स्थिर आणि अस्थिर मधुमक्षिका पालन कसे करावे, एकूणच त्यांनी व्यवसायाची सुरवात कशी केली त्यांना आलेल्या अडचणी त्यातून त्यांनी शोधलेल्या संधी आणि व्यवसाय उभारणी या संबंधी सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. कौशिक यांनी या केंद्रामार्फत राबवले जात असलेल्या विविध प्रशिक्षणाचा लाभ ग्रामणी युवकांनी घ्यावा असे आव्हानही केले. श्री. माणिक लाखे यांनी  मधुमक्षिका पालनचा शेती मध्ये विविध पिकात परागीभवनासाठी व्यवसाईक पद्धतीने कसा करावा या संबंधी मार्गदर्शन केले आणि दर प्रशिक्षणाचे संचालन उत्कृष्ठ पद्धतीने पार पाडले. श्री. राहुल पाटील यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाचे SWOT कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन केले, तर श्री. बडधे सचिन यांनी मधुमक्षिका पालनातील व्यवसाईक संधी व या उदयोगाचे  अर्थशास्त्र समजाऊन दिले.
या कार्यक्रमाच्या सांगता समारंभांसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे बारामती येथील जैविक तण व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण, डॉ. रवी कुमार यांनी उपस्थित राहून उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. तसेच परिसरातील प्रगतीशील शेतकरी श्री. हुकम बाबा नवले, श्री. जाधव शंकर बिहारी, श्री. योगेश पाटील, श्री नामदेव चेडे यांनी ही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार इंजी. राहुल पाटील यांनी केले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.