शाळेला 230 पुस्तके देऊन केला वाढदिवस साजरा local newsa


शाळेला 230 पुस्तके देऊन केला वाढदिवस साजरा 

जि. प. प्राथ. शाळा वडाळा बहिरोबा शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विकास कौसराम होंडे यांनी आपला मुलगा प्रज्ञेश विकास होंडे याच्या वाढदिवसानिमित्ताने
शालेय वाचनालयासाठी 230 पुस्तके भेट दिली.यामध्ये विद्यार्थ्यां बरोबर त्यांनी शिक्षकांचाही विचार केला. वाचनीय असे लेखन साहित्य त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल वडाळा शाळेचे मुख्या. आदरणीय पाथरकर सर यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.
श्री. विकास कौसराम होंडे यांचे शाळेला नेहमीच सहकार्य असते.
मोबाईलमुळे विद्यार्थी वाचनापासून दुरावत चालले आहेत. ज्ञान संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांबरोबर अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. यासाठी शाळेचे मुख्या. आदरणीय पाथरकर सर, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या सहका र्यातून नुकतेच 'ज्ञानसाधना' वाचनालय उभे करण्यात आले आहे. आणि विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होत आहे.
विद्यार्थ्यांचे रोज 1तास वाचन होईल यादृष्टीने सर्व शिक्षकांचे प्रयत्न सुरु आहेत. मुले आनंदाने पुस्तके वाचू लागली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.