आदिनाथ पठारे यांच्याकडून अविनाश गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 💐🚩
येवला येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या “अनुलोम संगम 2026” या भव्य कार्यक्रमात नेवासा तालुका विभाग जनसेवक तथा परममित्र अविनाशजी गायकवाड यांचा अनुलोम मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यकुशल कर्तृत्वाबद्दल सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते अविनाशजी गायकवाड यांचा सन्मान संपन्न झाला. अविनाशजी यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेत हा गौरव प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे नेवासा तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अविनाशजी यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी आदिनाथ पठारे यांनी अविनाशजी गायकवाड यांचे मनापासून अभिनंदन करत “अविनाशजींचे कार्य प्रेरणादायी असून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा” अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या.
अविनाशजी गायकवाड यांना पुढील कार्यासाठी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 💐🚩