प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीबद्दल शिरसगाव येथे सत्कार;* _शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांचा ठाम पाठिंबा_



*प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीबद्दल शिरसगाव येथे सत्कार;* _शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांचा ठाम पाठिंबा_ 

 *शिरसगाव :* माननीय कर्तव्यदक्ष आमदार विठ्ठलरावजी लंघे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रदेश उपाध्यक्षपदी नरेंद्र पा काळे निवड झाल्याबद्दल विशेष निमंत्रण देत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार साहेबांनी शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी जेष्ठ युवा नेते दादा पाटील पोटे, युवा नेते विवेक लंघे, गणेश लंघे, कॉन्ट्रॅक्टर दराडे साहेब, आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक पवार पाटील व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित राहून शुभेच्छा व्यक्त केल्या. भाऊसाहेब कावळे, प्रविण लंघे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

संवाद साधताना आमदार साहेबांनी निवड संदर्भ घेत, “काही अडचण निर्माण झाल्यास विशेष सहकार्य राहील,” अशी ग्वाही दिली. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्कार समारंभात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी निवडीबद्दल अभिनंदन करत पुढील सामाजिक, संघटनात्मक व शेतकरी हिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.