*त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगे पाटील यांना बेलपिंपळगावकर यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजन*
नेवासा : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 17 जुन 2025 रोजी सकाळी ठिक आठ वाजता श्री राम मंदिर सभामंडप येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
शिक्षण सम्राट यांनी शहरी भागात शाळा, महाविद्यालय उभे केले पण कमवा शिकवा योजनेतून उच्च शिक्षण घेऊन आय.ई.यस. झालेले शेतकरी कुटुंबातील भूमिपुत्र मेजर साहेबराव घाडगे पाटील होते. काल पर्यंत ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षण करिता पुणे, मुंबई येथे जात होते परंतु आज तिकडील विद्यार्थी शिक्षण करिता नेवासा फाटा येथे येतात. सैनिकी पद्धतीचे शाळा, कॉलेज, महाविद्यालय उभे करून ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा घेऊन येणारे कर्मवीर आदरणीय साहेब होते. महाराष्ट्र राज्यालाच नाही तर देशाला भुषण वाटावे असे कार्य साहेबांनी अंतिमश्वास घेऊ पर्यंत विध्यार्थी आणि संस्थेच्या कर्मचारी यांचे करिता आयुष्य खर्ची केले. अनेक तपानंतर असा युगपुरुष जन्मतो.
एक युगाचा आणि युगपुरुषचा अस्थ झाला. देहरूपी साहेब आपल्यात आज नाहीत परंतु त्यांच्या कार्यातून आणि विचाराने ते सदैव आपल्यात आहे.
"झालेत बहू, होतील बहू परी या सम हा!" कै. साहेबराव घाडगे पाटील यांचे महानिर्वाण झाले असेच म्हणावे लागेल. त्यांच्या अचानक जाण्याने शिक्षण क्षेत्र आणि नगर जिल्यातील फार मोठी हानी झाली आहे. अचानक ईह लोकांचा निरोप घेतल्यामुळे अनेकांना धक्का बसला. साहेब म्हणजे ज्ञानाचे अगर होते.कायद्याचे चालते बोलते विद्यापीठ होते.
ग्रामीण भागातील मुले, मुली यांचा सर्वांगीण विकास त्यांना अभिप्रेत होता. कर्म हिच पूजा मानून सदैव कार्य मग्न असणारे साहेब मी बघितले आहे. चौदा वर्ष म्हणजे सुमारे एक तप साहेबांचा मला सहवास लाभला. त्यांच्या सहवासात असताना खुप काही शिकायला मिळाले. एका शिपयाचा मला त्यांनी शाळा मास्तर केले. एक रुपया खिशात नसताना अध्यापक शिक्षण त्यांनी मला उपलब्ध करून दिले. स्वतःच्या मुलासारखे ते माझे लाढ करायचे. त्यांच्या अकसमक निधनाने माझ्यासाह राज्यभरातील त्यांच्या अनुयायी आणि चाहत्यांना धक्काच बसला. घाडगे पाटील, चव्हाण पाटील, आमले पाटील कुटुंब यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मी गणेश चौगुले सर साहेबांचा अनुयायी म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करतो. त्यांना विनम्र अभिवादन करीत असताना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या सर्व कर्मचारी यांना आव्हान करतो की संस्थेच्या लौकिक करिता आणि विद्यार्त्यांच्या प्रगती करिता कर्म हिच पूजा मानून नितांत कार्यात मग्न राहा दिलेली जबादारी चोक पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या तोडक्या मोडक्या शब्द सुमनांनी साहेबांना आदरांजली अर्पण करतो. कै. साहेबराव घाडगे पाटील अमर रहे.