आदर्श विद्यामंदिर सोनई माध्यमिक विभाग या विद्यालयात गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.
नेवासा प्रतिनिधी
दिनांक 15 नोव्हेंबर 2025 आदर्श विद्यामंदिर सोनई येथे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव माननीय श्री रविराज तुकाराम पाटील गडाख व संस्थेच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई रविराज पाटील गडाख या उपस्थित राहिल्यात. या प्रदर्शनीय उपकरणात पाचवी ते आठवी गटामधून एकूण 53 विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली व इयत्ता 9 वी,10 वी या गटामधून 17 उपकरणांची मांडणी केली. प्रत्येक गटातून सर्वोत्कृष्ट उपकरणे तालुकास्तरावर पाठविण्यात येणार आहे .या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री रविराज तुकाराम पाटील गडाख ,सौ. जयश्रीताई रविराज पाटील गडाख, पत्रकार श्री खंडागळे मामा, उद्योजक श्री सचिन भागवत, माजी मुख्याध्यापक श्री खेसमाळसकर सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री फोपसे सर , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दरंदले सर विज्ञान शिक्षक श्री पवार सर , तुवर सर, प्रशांत गडाख सर व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री दराडे सर यांनी केले तर आभार श्री बेलखेडे सर यांनी केले.