हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त जय हनुमान साप्ताहिक मिलनात उत्सवाचे आयोजन
नेवासा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जय हनुमान साप्ताहिक मिलन, मुकिदपूर शाखेतर्फे हिंदूसाम्राज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा जपणाऱ्या या पवित्र दिनानिमित्त सर्व स्वयंसेवक, नागरिक, आणि संघहितचिंतकांनी एकत्र येऊन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सोमवार, दि. १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ८.३० वा. हनुमान मंदिर, इरिगेशन कॉलनी, मुकिदपूर येथे होणार आहे. उपस्थित राहणाऱ्यांना वेळेच्या ५ मिनिटे आधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भरतकुमार नरहरी उदावंत (समाज प्रबोधक, चित्रकार व लोककलावंत, नेवासा फाटा) हे लाभणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. विजयकुमार ढोले (सह-बौद्धिक प्रमुख, उत्तर नगर जिल्हा) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
शिवछत्रपतींच्या जीवनतत्त्वांचे स्मरण करून समाजात राष्ट्रप्रेम, शिस्त व सेवा या मूल्यांची रुजवण करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--