बौद्ध पौर्णिमेनिमित्त नेवासा फाट्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन
नेवासा फाटा येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भगवान तथागत गौतम बुद्ध व बौद्धधर्माचे महान प्रचारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी डिवाय एसपी संतोष खाडे साहेब व भारतीय स्वाभिमानी संघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य गणपतराव मोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी मुकिंदपूरचे कामगार पोलीस पाटील आदेश साठे, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजयभाऊ गाढे, मराठा सुकन समितीचे गणेश झगरे, भारतीय स्वाभिमानी संघाचे युवा कार्यकर्ता राम मगरे, सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे, उस्थळ दुमळा गावचे कामगार पोलीस पाटील प्रमोद गायकवाड, पत्रकार ज्ञानेश शिनारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांचा ऐतिहासिक अभ्यास करून भारतात पुन्हा बौद्ध विचारांचा जागर केला, यावर प्रकाश टाकण्यात आला. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा असा संदेश त्यांनी दिला, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.