रवी धनवटेची राज्यभरात कौतुकास्पद कामगिरी : दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवून तयार केला आगळावेगळा विक्रम
नेवासा (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रात नेहमीच उच्च गुणांचे महत्त्व अधोरेखित केले जाते, परंतु नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी रवी राजेंद्र धनवटे याने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. यंदाच्या दहावीच्या एसएससी परीक्षेत रवीने प्रत्येक विषयात अचूक ३५ गुण मिळवून ३५ टक्क्यांसह यश संपादन करत एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला आहे. या आगळ्यावेगळ्या कामगिरीचे संपूर्ण नेवासा तालुक्यात आणि आता महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.
प्रत्येक विषयात नेमके ३५ गुण मिळवणे ही गोष्ट सहजासहजी शक्य नसते. ही बाब केवळ संयोग नाही, तर रवीच्या अचूक नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, आणि आत्मविश्वासाचे फलित आहे. रवीने केवळ उत्तीर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवले नाही, तर परिस्थितीवर मात करत, मर्यादित साधनांमध्ये राहून अभ्यासात प्रामाणिकपणा राखला.
रवीचे पालक, शिक्षक आणि मित्रमंडळी त्याच्या या यशाने भारावून गेले आहेत. आज जेव्हा अनेक विद्यार्थी अपयशाने खचून जातात, तेव्हा रवीसारख्या विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करत दाखवलेले धैर्य हे समाजासाठी आदर्श ठरते.
.