शेवगाव तालुक्यातील हातगांव येथील अखेर त्या सावकाराला सद्बुद्धी सुचली ....आज त्याने परत केली धनगर कुटुंबाची जमीन वापस ....!

*शेवगाव तालुक्यातील हातगांव येथील अखेर त्या सावकाराला सद्बुद्धी सुचली ....आज त्याने परत केली धनगर कुटुंबाची जमीन वापस ....!

 प्रतिनिधी:-हरिशदादा चक्रनारायण  
अहमदनगर
   वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसनरावजी चव्हाण साहेबांच्या प्रयत्नांना अखेर यश!धनगर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला!
सविस्तर वृत्त आज खूप मनस्वी आनंद आणि समाधान वाटतंय गेल्या 4 फेब्रुवारी 2023 रोजी शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील बाबासाहेब गुंजाळ नावाचेच अल्पभूधारक शेतकरी सगळी कडेचे दरवाजे ठोटाऊन शेवटचा आशेचा किरण म्हणून वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसनराव चव्हाण साहेबांकडे आले होते, सावकाराने केलेले शोषण दारातून हाकलून दिलेली वागणूक ही सगळी सगळी व्यथा त्यांनी चव्हाण सरांना सांगितली ...!
त्यांच्या मुलीच्या लग्नात गहाण ठेवलेली 1 लाखासाठी जमीन नाही मिळाली तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही ...हे शब्द ऐकून सरांनी त्यांना धीर दिला ....!काळजी करू नका असा काही वेडावाकडा  निर्णय घेऊ नका मी सोबत आहे ...आणि जमीन मिळेपर्यंत सोबत राहील मग तो सावकार कितीही मोठा असू द्या ....!असा त्यांना धीर दिला. आणि ते बापलेक मोठ्या आशेने घरी परतले .... चव्हाण सरांनी तास दोन तासात सोशल मीडियावर या संदर्भातली पोस्ट टाकली ....आणि या पोस्ट मध्ये शेवटी सावकाराचे नाव न टाकता फक्त सावकाराला सद्बुद्धी सुचो ...आणि शेतकऱ्याची जमीन परत करो ...असेही सरांनी लिहिले होते ... समजने वालोंको इशारा काफी होता हैं!आणि सावकाराला चव्हाण सरांचा इशारा समजला होता...! त्यामुळे सावकाराने  दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या त्या गावातील पदाधिकारी यांच्या बरोबर बैठक करून कृपया विषय वाढू नका  मी जमीन देण्यास तयार आहे ...आणि दुसऱ्याच दिवशी विषय संपला...!
पण त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये जमवायला 10 दिवस लागले आणि आज त्याची जमीन सावकाराने खरेदी खत करून त्याला परत केली ...!दोघेही बापलेक आज संध्याकाळी पेढे घेऊन प्रा.किसन चव्हाणांच्या घरी आले दोघेही अक्षरशः रडत होते,आभार मानत होते, त्यांनी सरांना पेढे दिले पण सरांनी त्या बापलेकांच्याच तोंडात  पेढे भरवले ...कारण त्यांनी सरांचे ऐकलं आणि आत्महत्येसारखा कुटुंबाला संपवणारा वेडावाकडा निर्णय घेतला नाही ....!असला निर्णय कोणीही घेऊ नये माझी हात जोडून विनंती आहे अशी साद चव्हाण सरांनी संपूर्ण शेवगाव तालुक्यातील. अल्पभुधारक शेतकऱ्यांना घातली होती...!
शेवटी कोणत्याही प्रश्नाला उत्तर असतेच ...फक्त वेळ लागतो!
सरांनी आभार मानले त्या सावकार मित्राचे त्याचीही पोस्ट वाचून संवेदनशीलता जागी झाली सद्बुद्धी सुचली आणि व्याजाच्या मोहाला अंगावर पाल पडावी आणि ती पटकन झटकून टाकावी तशी त्यांनीही व्याजाची पाल रात्रीतून झटकून टाकली आणि आज त्या विषयाला पूर्णविराम दिला ...!
शेतकरी ,सावकार आणि बोधेगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे बिन्नीचे सहकारी सगळ्यांना सरांनी धन्यवाद दिले...! 
शेवगाव तालुक्यातील प्रत्येक शेतकरी व युवा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रा.किसनरावजी चव्हाण साहेबांच्या कल्पक नेतृत्वाखाली स्वतःला सुरक्षित पाहू लागला आहे व सरांच्या रूपात शेवगांव- पाथर्डीला भावी आमदार मिळाल्याचे स्वप्न उराशी बांधून तन-मन-धनाने जोराने कामाला लागल्याचे चित्र शेवगाव तालुक्यातील प्रत्येक खेड्यात पाहावयास मिळत आहे!

Tags

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.