............*चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या*
अहमदनगर.
विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचा समावेश आहे. कटके यांची जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. *जिल्ह्याबाहेर बदली*
या चारही पोलीस निरीक्षकांना आता जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. काही जणांनी लगेचच "एलसीबीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवजयंतीच्या आधीच या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात यावे, असेही बदली आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे. अनिल कटके यांची जळगाव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची धुळे, तर सुनील पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तत्कालीन निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाल्यानंतर कटके यांनी सूत्रे हाती घेतली होते