-*आदर्श विद्या मंदीर प्राथमिक सोनई विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्सहात साजरी.*-
सोनई येथील आदर्श विद्या मंदिर च्या प्राथमिक विभागात आज सोमवार दि. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्सहात व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. व त्याचे औचित्य साधून विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान केली होती. यात मोठ्या संखेने विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनी जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या चारित्रावर व जीवनावर आधारित गोष्टींना उजाळा दिला. व त्यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. सदर प्रसंगी दोन्ही प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रविराज तुकाराम पा. गडाख यांच्या हस्ते केले. यावेळी वेषभूशेत सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षणाचे कामही मा. अध्यक्षसाहेबांनी केले. मा. अध्यक्षांनी आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे घडवले यावर भाष्य केले व तसेच आजचा विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे कोणते गुण अंगी बाळगावे याचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दरंदले सर यांनी केले. कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्ग्यापाक खेसमाळसकर सर तसेच माध्यमिक विभागाचे डाके सर, शिंदे सर यांनी परीक्षण म्हणून सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार श्रीम. दरंदले मॅडम यांनी केले. कार्यक्रमानंतर अध्यक्षसाहेबांतर्फे बिस्किट वाटप करण्यात आले.