वरखेड ग्रामपंचायत मध्ये राज्यघटनेची केली पायमल्ली.

प्रतिनिधी आबासाहेब शिरसाट
नेवासा 
तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत मध्ये राज्य‌ घटनेची केली पायमल्ली .संबधीतांवर‌ कायदेशिर  कारवाई करा.रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे नेवासा‌ तालुका अध्यक्ष मा.विजयभाऊ शिरसाठ.यांनी केली .गृहमंत्रालयाकडे मागणी. वरखेड येथे ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर धार्मिक फोटोचा वापर केलाआहे.महाराष्ट्र शासन परीपत्रक ग्रामविकास व जलसंधारण विभाग मुंबई याचं४ जानेवारी२०१७ नुसार.वरखेड या ग्रामपंचायत कार्यलयाचे ग्रामसेवक आण्णासाहेब तुकाराम डेंगळे.यांनी त्यांच्या कार्यलयीन लेटरहेडवर मुख्यपृष्ठावर लक्ष्मीआईचा फोटो छापुन गावातील सामाजिक बांधिलकी धोक्यात आणुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा पर्यत्न केला आहे.ग्रुप ग्रामपंचायत वरखेड हे कार्यलय खाजगी नसुन शासकीय कार्यलय आहे.ग्रामसेवक हे पद राज्य घटनेतील तरतुदी नुसार शासकीय पद आसुन त्यांचा परिषद् शिस्त व‌ अपिल अधिनियम१९६४अंतर्गत यांची‌ कर्तव्य व आधिकार मधील शास्ती नुसार कोण्त्याही काल्पनिक गोष्टी किंवा देवतांचे फोटो शासकीय कार्यलयाच्या लेटर हेड वर छापणे हा कायद्याने गुन्हा आहे.त्यांनी‌ राज्य घटनेची पायमल्ली केल्याचे निर्देशनास आले आहे.कार्यलयीन लेटर‌हेडवर देवताचा फोटो छापुन विशिष्ट धर्माला दजोरा देत आहेत.तसेच अंधश्रध्दा पसरवत आहे.जनता अंधश्रध्देत डुबत आहे.राज्य घटनेतील तरतुद व जिल्हापरिषद शिस्त व अपिल१९६४मधील तरतुदीची पायमल्ली.केली आहे.तरी या प्रकरणातील संबधीतावर कारवाई करण्यात यावी.तस न झाल्यास  जिल्हा परिषद अहमद नगर येथे आपल्या कार्यकर्ते सह आमरण उपोषण करणात येईल आशी माहिती   आर पि आय  ए.चे‌ तालुका अध्यक्ष मा.विजयभाऊ‌ शिरसाठ दिली.तसेचनेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मा.विजय करे यांना निवेदन द्याण्यात आले.यावेळी अध्यक्ष विजयभाऊ शिरसाठ.वंचित बहुजन आघाडीचे नेते‌अनिलभाऊ जाधव.जिल्हाप्रतिनीधी आबासाहेब शिरसाठ अदि.कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.