*भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांच्या यात्रा उत्सवनिमित्त मानाची झेंडा मिरवणूक असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धूम धडाका संपन्न...!*
नेवासा प्रतिनिधी
:- भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांचा मानाचा झेंडा मिरवणूक काढण्यात आली यावेळी भगव्या टोप्या घालून सजवलेला झेंडा घेऊन शहर व तालुक्यातील भगवाधारी भाजपा कार्यकर्ते झेंडा मिरवणूक मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते भाजपा नेवासा मंडलप्रमुख मनोजआण्णा पारखे यांनी या मिरवणुकीचे आयोजन केले होते यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. बाळासाहेब कोलते, जिल्हा उपाध्यक्ष माऊली पेचे, जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते ऋषिकेश शेटे, धर्मरक्षक गणेश चौगुले हे प्रमुख उपस्थित होते, नेवासा शहराचे ग्रामदैवत असलेल्या भगवान मोहिनीराज यात्रेनिमित्त मानाचा झेंडा मिरवणूक नेवासा शहरात काढली जाते. भगव्या झेंड्याला वंदन करणारे आणि जीवापाड जपणारे आम्ही सानतन संस्कृतीचे पाईक आहोत. भगवा रंग हा क्रांतीचे प्रतीक आहे. भगवा झेंडा पहिला की एक नवचैतन्य संचार होतो आम्ही सर्व सुजय पर्व हेच युवा पर्व आहे भारतीय जनता पार्टीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शन मध्ये वाटचाल करणारी आम्ही तरुणाई आहोत. धर्म, जातभेद या पलीकडे जाऊन सबका साथ सबका विकास जागतिक नेते नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृवात देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. हिंदुत्ववाचा भगवा असाच फडकत राहावा त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे मनोगत यावेळी मनोज पारखे, ऋषिकेश शेटे, बाळासाहेब कोलते माऊली पेचे यांनी बोलताना व्यक्त केले.
या झेंडा मिरवणूक मध्ये नगरसेवक निरंजन डहाळे, महेश लोखंडे, आदिनाथ पटारे, अशोक टेकणे, महेश नवले, निलेश लोखंडे, गोविंद कदम, शिवाजी लष्करे, अमोल पिटेकर, शुभम सपकाळ, राजेश कडु, प्रवीण दारुंटे, तेजस मन्नत, बंटी दिघे, देविदास साळुंके, नानासाहेब डौले, शंकर कणगरे, रोहित लष्करे, रोहित पवार, दिनेश गुंजाळ, रोहन कुसळकर, गणेश गाढवे, निरंजन वालतुरे, माऊली जाधव, विशाल धनगर, आदिनाथ निकम, प्रमोद घावटे, बंटी दिघे, महेश भुसारे, नितीन शिंदे, सुशांत पारखे, महेश पारखे, बाबा कुसळकर, कुंडलिक आळकुटे, महेश आरले, शुभम बेहळे, यश कदम, विजय दहिवाळकर, रितेश कराळे, बाबा डुकरे, रमेश घोरपडे, बंडु वाघमारे, सुनिल हारदे, विलास बोरुडे, अनंता डहाळे, वैभव औटी, भारत चव्हाण, सागर चव्हाण, राम गडाख, संदीप पारखे, प्रताप कोंगे, महेश पवार, संतोष चांदणे, राहुल कुसळकर, श्रीराम लष्करे, गणेश लोखंडे, योगेश कोलते, अंबादास लोखंडे, सागर गंगुले आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मिरवणुकीनंतर सर्व कार्यकर्त्यांना भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ बाबासाहेब कोलते यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.