कै. कचराबाई सिताराम मंचरे यांचे निधन — शुक्रवारी दशक्रिया, ९ फेब्रुवारीला तेरावा


🕯️ कै. कचराबाई सिताराम मंचरे यांचे निधन — शुक्रवारी दशक्रिया, ९ फेब्रुवारीला तेरावा

तामसवाडी (प्रतिनिधी) :
तामसवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तथा ग्रामस्थांच्या परिचयाच्या कै. कचराबाई सिताराम मंचरे (गं.भा.) यांचे बुधवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मंचरे परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. कचराबाई मंचरे यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम शुक्रवार दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०८.०० वाजता तामसवाडी बाजारतळ येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच तेरावा सोमवार दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी राहत्या घरी (सजलपूर पाटाजवळ) होणार आहे.
या प्रसंगी ह.भ.प. सिताराम महाराज सुकाळकर यांचे प्रवचन होणार असून नातेवाईक, ग्रामस्थ व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शोकाकुल कुटुंबीयांमध्ये
श्री भास्कर लहानू मंचरे (पुतणे),
सौ. अहिल्याबाई राजेंद्र डोईफोडे (मुलगी), सौ. शोभा जालिंदर भोसले (मुलगी)
यांच्यासह समस्त मंचरे परिवार व आप्तेष्ट नातेवाईक यांचा समावेश आहे.
ठिकाण : तामसवाडी बाजारतळ
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.