हजार रुपयांत ३ ब्रास वाळू घरपोच! नेवाशात घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा – जप्त वाळूचा पंचनामा करून गरजूंसाठी थेट वाटप!

🔥 ३ हजार रुपयांत ३ ब्रास वाळू घरपोच! नेवाशात घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा – जप्त वाळूचा पंचनामा करून गरजूंसाठी थेट वाटप! 🔥
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील 
एसडीएम सुधीर पाटील साहेब, यांच्या प्रयत्नांना यश – नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, कृष्णा परदेशी महायुती नगरसेवकांचा पुढाकार; प्रशासनाचा ठाम निर्णय
नेवासा | प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आणि जनहिताचा निर्णय प्रत्यक्षात उतरला आहे. शासनाने जाहीर केलेल्या “पाच ब्रास वाळू” योजनेचा लाभ नेवासा तालुक्यात खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू लागला असून, अवघ्या ३ हजार रुपयांत ३ ब्रास वाळू घरपोच करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत महसूल विभागाचे अधिकारी   एसडीएम सुधीर पाटील साहेब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच या कारवाई करत वाळू जप्तीचा निर्णयामुळे वाळूअभावी रखडलेली घरकुल बांधकामे आता वेगाने मार्गी लागणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ही वाळू तहसीलदार कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेली असून, महसूल प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त वाळूचा अधिकृत पंचनामा केला. त्यानंतर ही वाळू गरजू घरकुल लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी वितरित करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेमुळे शासनाचा निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
घरकुल फक्त मंजूर करून थांबणार नाही, घर उभं राहिलंच पाहिजे!” –नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले

घरकुल बांधकाम करताना सर्वात मोठी अडचण वाळूची उपलब्धता आणि वाढता खर्च ही असते. वाढती महागाई, अवैध वाळू तस्करी, तसेच बाजारभावामुळे गरीब व मध्यमवर्गीय घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम अनेकदा रखडते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा मार्ग मोकळा केला. त्यामुळेच आज गरजूंच्या घरासाठी आवश्यक असलेली वाळू थेट उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमासाठी नेवासा नगरपंचायतच्या नगरसेवकांनी आक्रमकपणे पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. जप्त वाळूचा पंचनामा करून ती वाळू घरकुल लाभार्थ्यांना मिळावी, यासाठी नगरसेवकांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडली. त्यामुळे “घरकुल मंजूर होऊनही बांधकाम रखडू नये” ही मागणी प्रत्यक्षात उतरून लाभार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
जप्त वाळूच्या पंचनाम्यावेळी नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्यासह महायुतीचे नगरसेवक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक प्रवीण सरोदे,  कृष्णा परदेशी, महेश लोखंडे, संदीप सरकाळे, निरंजन डहाळे, अनिल पवार, अंकुश मस्के तसेच इतर सहकारी नगरसेवक उपस्थित होते. सर्व नगरसेवकांनी “गरजूंच्या घरासाठी न्याय मिळालाच पाहिजे” या भूमिकेतून हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले.
या संपूर्ण प्रक्रियेत महसूल विभागाने नियमाप्रमाणे कारवाई करत वाळू जप्तीचा पंचनामा पूर्ण केला. पंचनाम्यावेळी महसूल विभागाकडून नायब तहसीलदार बोरुडे साहेब, मंडळ अधिकारी गव्हाणे साहेब, तलाठी पल्लवी पवार, तलाठी परदेशी भाऊसाहेब, काडाळी मॅडम (तलाठी), लहारे भाऊसाहेब, सोपान गायकवाड उपस्थित होते. तसेच नगरपंचायत/शासन यंत्रणेकडून घरकुल अधिकारी राहुल आढाव, शहर समन्वयक तुषार सरगर, मुख्य अधिकारी (नगरपंचायत), तसेच एसडीएम सुधीर पाटील साहेब यांचीही उपस्थिती होती. प्रशासन, नगरपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय साधून हा उपक्रम पारदर्शकपणे राबवण्यात आल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले.

या उपक्रमामुळे नेवासा तालुक्यात शासनाच्या घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचा ठोस संदेश गेला आहे. लाभार्थ्यांनी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि प्रशासनाचे आभार मानत हा उपक्रम नियमित, पारदर्शक आणि सातत्याने सुरू ठेवावा अशी मागणी केली आहे.
तसेच ज्यांना ज्यांना घरकुलामध्ये लाभार्थ्यांना वाळू मिळाले आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.