नेवासा फाटा येथे चोरी करताना महिला रंगेहात ताब्यात

नेवासा फाटा येथे चोरी करताना महिला रंगेहात ताब्यात 

बसथांब्यावरील प्रवाशांमुळे मोठा अनर्थ टळला
प्रतिनिधी:( ज्ञानेश सिन्नरकर)नेवासा 
नेवासा फाटा येथे चालू असलेल्या चोऱ्या थांबताना दिसत नाहीत अगदी काही दिवसांपूर्वीच एका महिलेचे पाच तोळे सोने चोरीला गेले असताना त्याचा तपास लागत नाही तोवर आज रोजी रिक्षामध्ये बसलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे काम करताना प्रवाशांनी रंगेहात पकडले. एका महिलेचे गळ्यातील दागिने हस्तगत केले असून दुसऱ्या महिलेचे मात्र गळ्यातील दागिने दुसऱ्या चोरट्या महिलेने आणि तिच्या साथीदाराने पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सदर महिला आणि तिच्या साथीदाराला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी चालू आहे
सदर घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ माजली असून पोलिसांनी त्वरित या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.