मुकिंदपुर ग्रामपंचायत कार्यालय व मुकिंदपुर येथील जि.प.प्रा.शाळा,कडा कॉलनी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,आहिल्यानगर अंतर्गत तालुका विधी सेवा समिती,नेवासा यांचे मार्फत बालविवाह मुक्त भारत या विषयावर कायदेशीर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.यावेळी प्रथमत: राजमाता जिजाऊ जयंती निमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून व राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेछ्या देऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली
.याप्रसंगी नेवासा न्यायालयातील विधी सेवा समितीचे विधी सेवा सल्लागार व पब्लिक नोटरी भारत सरकार एड.सौ.स्मिता लवांडे यांनी बालविवाह या विषयावर अत्यंत विस्तृतपणे कायदेशीर मार्गदर्शन केले.यामध्ये बालविवाह,हुंडाबळी,स्रिभ्रूण हत्या,महिलांची सुरक्षितता यावर कायदेशीर मार्गदर्शन केले
.याप्रसंगी मुकिंदपुर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पनाताई सतिष निपुंगे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या.तसेच मुकिंदपुरचे पोलीस पाटील आदेश साठे,ग्रामविकास अधिकारी संतोष खंडागळे,मुकिंदपुर ग्रामपंचायतच्या अंगणवाडी सेविका कांडके ताई,मदतनीस मंडलिक ताई,सामाजिक कार्यकर्ते अशोक दळवी,मुकिंदपुर परिसरातील नागरिक व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान देणारे ग्रामपंचायत कर्मचारी विशाल तिवारी,पप्पू मगर,किरण निपुंगे,कांडके पाटील,किशोर इंगळे,सरोदे त्याचप्रमाणे मुकिंदपुर कडा कॉलनी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी व आदी मुकिंदपुर ग्रामस्थ उपस्थित होते.