*आर के एन्टरप्राइजेस कढुन कबड्डी खेळाडू साठी किट वाटप* *विध्यार्थी आणि खेळाडू यांचा सर्वांगीण विकास व्हावा रेवणनाथ कांगुणे*


*आर के एन्टरप्राइजेस कढुन कबड्डी खेळाडू साठी किट वाटप* *विध्यार्थी आणि खेळाडू यांचा सर्वांगीण विकास व्हावा रेवणनाथ कांगुणे*

 नेवासा : नेवासा तालुक्यातील श्री हनुमान विद्यालय येथील खेळाडूंना कबड्डी खेळाडू यांनी गावाचे नाव रोशन करावे मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणुन सातत्याने आवश्यक असणारी मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे रेवण कांगुणे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ. बेलपिंपळगाव गावातून पोलीस भरती, राज्य सेवा आणि केंद्र सेवा करिता अभ्यास करणाऱ्या विध्यार्थी यांना देखील नियमित मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करण्याचा आर के एन्टरप्राइजेस चा मानस आहे. रडत न बसता लढत राहणाऱ्या गावातील विद्यार्थी आणि तरुणांचा गावाला सार्थ अभिमान. हे राज्य तयांचे जो जो करील जयांचे. गावातील तरुणांचा सर्वांगीण विकास व्हावा. प्रत्येक क्षेत्रात आमच्या ग्रामीण भागातील मुलांनी प्रगती करावी. तुम्ही प्रयत्न करा लढा द्या मी सदैव तुमच्या सोबत आहे. जी काही मदत लागेल ती मी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करेल असे आर के इंटरप्राइजेसचे कांगुणे यांनी सांगितले. सोलर क्षेत्रात देदीप्यामान कामगिरी करत शेतकऱ्यांच्या जीवनात हिरवळ हरित क्रांतीसाठी योगदान देणारे कांगुणे आहेत. नेवासा तालुक्यात हजारो शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करुन राज्यात सर्वाधिक लाभ अहिल्यानगर जिल्ह्याला मिळवून देण्यात आर के इंटरप्राइजेस चोवीस तास सेवा देणारे दोनशे तरुण बेलपिंपळगाव येथे सक्रीय आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.