सुदर्शन विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन...
नेवासा .(प्रतिनिधी गणेश झगरे -) पिचडगाव येथील सुदर्शन
विद्यालयात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व युवा पिढीचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद याची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कोळेकर होते प्रास्ताविक श्री कैलास कर्जुले सरानी केले, यावेळी कु दिव्या झगरे ,हीने राजमाता जिजाबाई यांच्या कार्याचा उल्लेख करताना संस्कार करणारे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणात दिले म्हणून स्वराज्य स्थापना केली ,आज फडकणारा भगवा झेंडा केवळ जिजाऊ माॅं साहेब मुळेच आहे ,महिलांचे रक्षण करणे ही शिकवण त्यानी शिवाजी महाराजांना दिली , कु,श्रावणी शिरसाठ ,कु लक्ष्मी नवघरे ,तेजस जावळे ,लहारे अथर्व यांनी भाषण केलेया प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शकुर इनामदार , हनुमान गंधारे सर गणेश कचरे सर,श्रीमती मनिषा जगताप यांच्या हस्ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले अध्यक्षिय मनोगत मांडताना मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कोळेकर सरांनी सांगितले की जगात अनेक राण्या झाल्या, महाराण्या झाल्या पण जिजाऊंसारखी राजमाता दुसरी झाली नाही आपल्या पतीचं स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पुत्र शिवाच्या मनात पेरल नुसत पेरलं नाही तर सुसंस्काराच्या अमृत सिंचनाने ते फुलवल. त्याला वाढवल त्याला डोळ्यात तेल घालून जीवापाड जपल याला नवनवी पान फुल दिली
आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना योग्य दिशा देतील .विद्यार्थ्यांनी जीवनात त्यांचे चरीत्र वाचावे असे अहवान करून अभिवादन केले
सुत्रसंचालन गणेश कचरे सर यांनी केले ,