बादल परदेशी,रामदासजी गोल्हार, तुकाराम बर्डे व हिराताई शिरसाठ, तुकाराम यांचा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य सन्मान


बादल परदेशी,रामदासजी गोल्हार, तुकाराम बर्डे व हिराताई शिरसाठ, तुकाराम  यांचा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य सन्मान

प्रतिनिधी : गणेश झगरे
मक्तापूर (ता. नेवासा) येथे सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता मारुती मंदिर परिसरात राजमाता जिजाऊ जयंती उत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मराठा सूकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश झगरे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे.
या जयंती उत्सव सोहळ्यास श्रीराम साधना आश्रम, मुकिंदपुर येथील महंत सुनिलगिरी महाराज, पिचडगाव येथील महंत ह.भ.प. ज्ञानेश्वर हजारे महाराज तसेच मक्तापूर येथील श्री स्वामी समर्थ आश्रमाचे ह.भ.प. राजेंद्र गिर्‍हे महाराज यांचे पावन आशिर्वाद लाभणार आहेत.
कार्यक्रमास शिर्डी लोकसभा विभागाचे खासदार मा. श्री. भाऊसाहेब वाकचौरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ना. शंकरराव गडाख साहेब, नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. विठ्ठलराव लंघे पाटील, युवा नेते मा. श्री. उदयन दादा गडाख, माजी पंचायत समिती सभापती मा. श्री. रावसाहेब कांगुणे, नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा. श्री. करणसिंह घुले तसेच युवा उद्योजक मा. श्री. सिद्धांत दादा नवले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान. यामध्ये
श्री. बादलभाऊ परदेशी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
 श्री. रामदासजी गोल्हार साहेब यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार
सौ. हिराताई आबासाहेब शिरसाठ (उपाध्यक्षा, राष्ट्रीय मानवअधिकार हक्क समिती, महाराष्ट्र) यांना जिजाऊ पुरस्कार,
श्री. तुकाराम मोहनीराज बर्डे यांना मराठा भूषण पुरस्कार, देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर करत समाजघडणीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा हा सोहळा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक जयंती उत्सव सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन मराठा सूकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश झगरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.