वडाळा बहिरोबा उपसरपंच पदी सुनीता लहू मोटे बिनविरोध निवड
वडाळा (प्रतिनिधी )वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच ललित पांडुरंग मोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली उपसरपंच पदासाठी एकमेव सुनिता लहू मोटे यांचा अर्ज प्राप्त झाला होता विरोधी उमेदवार नसल्याने सौ सुनीता लहू मोटे यांची ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे यांनी बिनविरोध निवड झाली जाहीर केले यावेळी विश्वनाथ शेळके सर व भाऊसाहेब दादा मोटे तात्या यांनी आपले मनोगत व्यक्त केले सरपंच ललित मोटे यांनी आपल्या आपल्या मनोगत माझ्या ग्रामस्थांनी व सहकारी सदस्यांनी मला मोलाचं सहकार्य केले गावच्या विकासाठी हेवेदावे, मतभेद विसरून
पंचसूत्रीचा मेळ घालत एक दिलाने काम केल्यास कोणतंही गाव विकासापासून वंचित राहू शकत नाही. असे प्रतिपादन सरपंच ललित मोटे पाटील यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच बाबासाहेब मोटे सचिन मोटे तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष एडवोकेट नानासाहेब मोटे प्रतीक मोटे निखिल मोटे सौ.रंजना राऊत सौ.उज्वला मोटे सौ. मंगलबाई पटेकर बाळासाहेब जामकर विठ्ठल पवार सुरेश मोटे लक्ष्मण मोटे विश्वनाथ घाडगे रावसाहेब मोटे अशोक कांबळे श्रीकांत मोटे सुनील पतंगे संग्राम मोटे नकुल मोटे चंद्रकांत मोटे विनोद पाटेकर सुरेश राऊत रोहिदास मोटे प्रभाकर डौले आनंद मोटे विकास होंडे सुजित मोटे राजेंद्र मोटे विशाल मोटे मनोहर लवांडे सचिन गाडेकर अर्जुन कुऱ्हाडे अनिल आडगळे इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे यांनी केले उपस्थितीचे आभार बाबासाहेब मोटे यांनी मानले