नाताळ महोत्सवाला टोका येथे उत्स्फूर्त प्रतिसाद,
विश्वाच्या कल्याणासाठी केली प्रार्थना
नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील टोका प्रवरासंगम येथे सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित नाताळ महोत्सवाला सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या नाताळ महोत्सवात ख्रिस्ती धर्मगुरूंनी मानव जातीच्या उद्धारासाठी व विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली यावेळी झालेल्या प्रार्थना सभेप्रसंगी भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
टोका येथील समाज मंदिर प्रांगणात झालेल्या नाताळ महोत्सव कार्यक्रम प्रसंगी आयोजक सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतवन खंडागळे यांनी आलेल्या सर्वधर्मीय नागरिकांसह उपस्थित ख्रिस्ती धर्मगुरूंचे स्वागत करून प्रास्ताविक केले.राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे म्हणून आम्ही दरवर्षी नाताळ महोत्सवाचे आयोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित ख्रिस्ती धर्मगुरूंचा सन्मानचिन्ह देऊन प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी झालेल्या नाताळ महोत्सव प्रसंगी पास्टर दयानंद इंगळे,पास्टर दत्ता अमोलिक,पास्टर संजय सरोदे
पास्टर बाबासाहेब ताकवले,पास्टर किशोर बोर्गे,पास्टर संदीप गाढवे यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचे महत्व विषद करून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जगाच्या उद्धारासाठी व मानव जातीच्या कल्याणासाठी झाला असल्याचे सांगितले.यावेळी सिस्टर चेतना अमोलिक, सिस्टर एस्तेर अमोलिक,लोणी येथील शुभांगी उर्फ डॉली आरवडे,रिबीका बोधक,सविता शामगिरीकर,वर्षा जगधने यांनी भक्तिगीते गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी झालेल्या नाताळ महोत्सव कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे,
प्रांताधिकारी सुधीर पाटील,तहसीलदार डॉ.संजय बिरादार,माजी मंत्री शंकरराव गडाख परिवारातील सदस्य युवा नेते विश्वादाता गडाख,माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील,टोका गावचे माजी सरपंच वसंतराव डावखर, भारत गवळी,खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन संतोष फिरोदिया,प्रवरासंगमचे माजी सरपंच सुनील बाकलीवाल,
उपसरपंच नितीन भालेराव,श्री कालभैरवनाथ फिटनेस सेंटरचे प्रमुख आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले सर,उद्योजक दीपक आगळे, अंगणवाडी सेविका श्रीमती मंगलताई भाकरे-घोडके, सौ.सुवर्णाताई गायकवाड, गायिका मुमताज शेख,नाताळ महोत्सव कमिटीचे सदस्य योगेश आवटी,सुनील खंडागळे, राजेंद्र खंडागळे,किरण खंडागळे, विजय खंडागळे,संतोष खंडागळे,विनायक खंडागळे,मेजर संतोष खंडागळे,मेजर काकासाहेब खंडागळे,रविंद्र खंडागळे,दिलीप खंडागळे, संजय खंडागळे,दीपक खंडागळे, संदीप खंडागळे,सोपान खंडागळे,बाळू खंडागळे,विलास खंडागळे,भारत खंडागळे, नंदू सोनवणे, रविंद्र सोनवणे, संतोष मोरे,नितीन भालेराव, श्रीकांत गायकवाड,राजेंद्र खंडागळे,भरत गायकवाड यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिद्धेश्वर बहुउद्देशीय संघटनेचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शांतवन खंडागळे यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.उपस्थित हजारो भाविकांनी प्रभू भोजन देण्यात आले.