नेवासा नगरपंचायतवर महायुतीचा भगवा, पण सभागृहात गडाखांचा करिष्मा कायम!
नेवासा नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचे शिवसेना उमेदवार डाॅ. करणसिंह घुले यांनी नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत महायुतीचा झेंडा फडकावला. मात्र दुसरीकडे, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने सभागृहात ९ नगरसेवक निवडून आणत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान पटकावला आहे.
नगराध्यक्षपद महायुतीकडे गेले असले, तरी नगरपंचायतीच्या राजकारणावर गडाख गटाची मजबूत पकड कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. जनतेने एकीकडे महायुतीवर विश्वास दाखवला, तर दुसरीकडे क्रांतिकारी शेतकरी पक्षाला संख्याबळ देत सत्ता संतुलनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पक्षनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :
🔴 क्रांतिकारी शेतकरी पक्ष (शंकरराव गडाख) – ९ नगरसेवक विजयी
🟠 महायुती (शिवसेना) – ६ नगरसेवक विजयी + नगराध्यक्ष पद
🔵 आम आदमी पार्टी – १ नगरसेवक विजयी
⚪ अपक्ष – १ नगरसेवक विजयी
या निकालामुळे नेवाशाच्या राजकारणात नवीन समीकरणे आकाराला येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बहुमतासाठी कोणाचा हात कोणात जाणार, विकासकामांचे सूत्र कोणाच्या हातात राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीचा नगराध्यक्ष असला तरी निर्णयप्रक्रियेत क्रांतिकारी शेतकरी पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात नेवासा नगरपंचायतीत राजकीय चढाओढ आणि रणनीतीचे राजकारण रंगणार हे निश्चित.