नेवाशात ‘आप’चा झेंडा फडकला – दिल्लीचे आमदार प्रकाश जारवाल यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघातमहाराष्ट्रातील आम आदमी पार्टीच्या पहिल्या नगरसेविका शालिनी सुखदान यांच्या सत्कारप्रसंगी आम आदमी पार्टीला महाराष्ट्रातून नेतृत्व मिळाले असल्याचे दिल्लीच्या आमदारांनी काढले उदगार



🔥 नेवाशात ‘आप’चा झेंडा फडकला – दिल्लीचे आमदार प्रकाश जारवाल यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीच्या पहिल्या नगरसेविका शालिनी सुखदान यांच्या सत्कारप्रसंगी आम आदमी पार्टीला महाराष्ट्रातून नेतृत्व मिळाले असल्याचे दिल्लीच्या आमदारांनी काढले उदगार

नेवासा | प्रतिनिधी
नेवासा नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात प्रथमच आम आदमी पार्टीची नगरसेविका म्हणून शालिनी सुखदान विजयी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याची दखल घेत आम आदमी पार्टीने थेट मंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीचे आमदार प्रकाश जरवालना शालिनी सुखदान यांच्या यांच्या भेटीसाठी पाठवले, यावेळी नेवासा येथे त्यांच्या सत्कारप्रसंगी दिल्लीचे आम आदमी पार्टीचे आमदार प्रकाश जारवाल यांनी, आम आदमी पार्टीला नेवास तालुक्यातील जनतेने निवडून दिल्याबद्दल नेवासा येथील जनतेचे ,तसेच शालिनीताई सुखदान, व संजय सूखदान तसेच प्रदेश अध्यक्ष अजित फटके व, सादिक शिलेदार व सर्व संघटनेचे हार्दिक स्वागत केले व आभार मानले तसेच ,सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत “जनतेने पर्याय स्वीकारला असून ही फक्त सुरुवात आहे” असा स्पष्ट इशारा दिला.
जारवाल म्हणाले, “तसेच भ्रष्टाचार, अपूर्ण विकासकामे, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि बेरोजगारी यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी थेट पक्षाची ताकद आपल्या सोबत आहे तसेच स्थानिक पातळीवर पूर्णपणे निर्णय घेण्याची जबाबदारी विकास कामातून  घेण्याचे अधिकार वैयक्तिक असल्याचे, तसेच दिल्ली च्या राजकारणाशी निगडित नसल्याचे जरवाल यांनी सांगितले. तसेच यावेळी संजय सुखदान यांनी सत्ताधारी भाजपचे आहिल्या नगर जिल्ह्यात दोनच उमेदवार निवडून आले असल्याचे वक्तव्य केले ,व आम्ही आम आदमी पार्टी कडून पहिले आहोत तर आमच्या मध्ये व सत्ताधाऱ्यांमध्ये फार मोठा अंतर राहिलेला नाही आहे ,व आगामी काळात आम्ही पक्षाला मोठ करू शकतो असे प्रकाशजी यांच्याशी बोलताना स्पष्ट सांगितले
यावेळी आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके, युवा नेते संजय सूखदान, जिल्हाध्यक्ष राजू आघाव, तालुकाध्यक्ष सादिक शिलेदार, शहराध्यक्ष संदीप आलवणे यांच्यासह प्रवीण तिरोडकर, करीम सय्यद,  सलीम भाई सय्यद, राहुल वाघमारे, अमोल वाघमारे ,किरण वाघमारे  , पप्पू वाघमारे, सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष अजित फाटके यांनी सांगितले, “नेवासा हा परिवर्तनाचा प्रारंभबिंदू ठरेल. आगामी काळात महाराष्ट्रात आम आदमी पार्टी ताकदीने उभी राहील.” तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्वांचा परिचय एडवोकेट सादिक शिलेदार यांनी प्रकाशजी  यांच्याशी केले.तसेच याप्रसंगी प्रकाश जी व शालिनीताई तसेच प्रदेशाध्यक्ष फाटके, व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले
सत्काराला उत्तर देताना नगरसेविका शालिनी सुखदान यांचे पती संजय सुखदान, हे म्हणाले की “मी जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. पारदर्शक कारभार आणि विकास हाच माझा अजेंडा आहे.” यानंतर पंचायत समिती येथून खोलेश्वर गणपती चौक येथे पर्यंत स्थानिक महिला व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले तसेच या प्रसंगी जरवाल व संजय सुखदान यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले
नेवाशातील या राजकीय घडामोडीमुळे पारंपरिक पक्षांचे धाबे दणाणले असून, ‘आप’च्या प्रवेशाने स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.