सलाबतपूर येथे तवकलशहावली बाबा उरूसात मानाची चादर मिरवणूक; स्वाती पुणेकर व वैद्ययही जाधव यांच्या लावणीने रसिक मंत्रमुग्ध
नेवासा | प्रतिनिधी
दिनांक 12/12/2025 रोजी मौजे सलाबतपूर, तालुका नेवासा येथे तवकलशहावली बाबा यांच्या उरूसानिमित्ताने मानाची चादर मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत लावण्यवती स्वाती पुणेकर तसेच वैद्ययही जाधव यांनी आपल्या अदाकारीत नृत्य सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या लावणी नृत्याने सलाबतपूर व पंचक्रोशीतील रसिकांना लावणीचे सांस्कृतिक महत्व प्रभावीपणे पटवून दिले.
या चादर मिरवणुकीत शिरूर येथून आलेले तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते व लेखक माननीय श्री. रामदासजी राऊत सर, बारामती येथील डॉ. श्री. मोरे सर, रमेश खुडे काठापुरकर तसेच मराठी फिल्म अभिनेत्री अलका जोगदंड मॅडम यांनीही सहभाग घेत तवकलशहावली बाबा यांचे दर्शन घेतले.
यावेळी सलाबतपूर येथील बाळासाहेब निकम, सुनील नजन, अशपाक शेख, जाऊल शेख, सरपंच आझर शेख, शाहीर खंदारे, प्रताप खंदारे, दीपक खंदारे, नितीन खंदारे, भोलेश्वर खंदारे, चंदू शेठ, खडका फाटा येथील माजी सरपंच परवेज पठाण, पास्टर भास्कर भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
उरूस व चादर मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीतील सर्व सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे सलाबतपूर व पंचक्रोशीतून ‘वाह वाह’च्या प्रतिक्रिया उमटत होत्या. तसेच कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी केपी बॉडीगार्ड बाऊन्सर टीमने उत्कृष्ट सहकार्य करत शिस्तबद्ध व्यवस्था राखली.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव, सांस्कृतिक रंगत आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा ठरला.
.