*धाडस सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी धर्मरक्षक गणेश चौगुले यांची निवड व नियुक्ती पत्र प्रधान*
नेवासा :- धाडस सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भाऊ ठोंबरे यांनी सामाजिक कार्यातील जिगरबाज बाजींदा गणेश चौगुले यांची नियुक्ती केली.नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव चे भूमिपुत्र योद्धा गणेश चौगुले यांची धाडस सामाजिक प्रतिष्ठान उत्तर महाराष्ट्र राज्य प्रमुख पदी निवड.
लोकांच्या सामाजिक प्रश्न, शेतकरी यांचे पाटपणी प्रश्न, दुध दर, कांदा, कापुस, सोयाबीन आदि प्रश्नावर सातत्याने लढा देतात.
मराठा आरक्षण करिता अर्ज, विनंती, निवेदन, उपोषण, आमरण उपोषण, मोर्चा, आंदोलन मध्ये नेहमी सक्रीय सहभाग असतो. समाजातील विविध घटकतील वंचित, शोषित, अन्याय अत्याचार विरोधात सातत्याने लढा देतात. अजात क्षत्रू म्हणुन सामाजिक कार्यात सदैव सक्रीय आणि तत्पर युवा नेतृत्व म्हणजे गणेश चौगुले सर होय.
रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून पंतप्रधान आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. लोकांचे रेशन कार्ड मधील नाव कमी करणे, विभक्त करणे, नवीन नाव समाविष्ट करणे, नवीन रेशन कार्ड बनवणे, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, बांधकाम मजूर कामगार योजना, श्रावण बाळ योजना, घरेलू कामगार महिला, बचत गट आदिना मार्गदर्शन करणे सामाजिक हिताचे कार्य अनेक कार्यक्रम आयोजित करणे.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून चाळीस पेक्षा अधिक वेळा रक्तदान केले. रक्तदान शिबीर आयोजित करतात. बाहुअयामी व्यक्तिमत्व म्हणजे गणेश चौगुले होय.
त्यांच्या निवडीबद्दल निवृत्ती सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाळासाहेब निपूंगे, माजी सरपंच दादासाहेब कोकणे, धर्मवीर प्रतिष्ठान चे संदीप भाऊ लष्करे, युवा नेते कुणाल बोरुडे, गजानन मुंडलिक, धनूभाऊ कनगरे, योगेश शेळके, श्रीकांत शिंदे, बाळासाहेब शेंडगे, तोफीक पठाण, आत्मदीप हॉस्पिटल चे प्रकाश शेटे आदींनी अभिनंदन केले. भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.