त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान द्वारा संचलित दादासाहेब घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकिंदपूर येथे सर्व विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर माऊली या विषयावर व्याख्यान देताना लेखक व प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड


त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान द्वारा संचलित दादासाहेब घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकिंदपूर येथे सर्व विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर माऊली या विषयावर व्याख्यान देताना लेखक व प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड

 पञकार संदीप भाऊ वारकड वडाळा बहिरोबा: संत ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानज्योत अखिल मानव जातीला अखंडित महाऊर्जेचे प्रेरणास्त्रोत!
 लेखक , प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड , अहिल्यानगर 
           त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान द्वारा संचलित दादासाहेब घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकिंदपूर येथे  विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर माऊली या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच श्री दत्तात्रय  भगवान यांचे जयंती दिनानिमित्ताने  पवित्र व पावन तीर्थक्षेत्र देवगड व भगवान श्री दत्तात्रय यांचे भजन,  स्मरण व महिमा वर्णिण्यात आला . लेखक व प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचे जीवन प्रवास यावर व्याख्यान दिले.
    संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जीवन प्रवास अंगावर शहारे निर्माण करणारा आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांचे मोठे बंधू जनता निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी गुरुस्थानी मानले. तेराव्या शतकामधील परिस्थिती हे भेदभाव स्पृश्य अस्पृश्य मानणारे होते अज्ञान, अंधकार ,दारिद्र्य याने समाज ग्रासलेला होता याचे मुख्य पाळीमुळे हे अज्ञानात होते हे संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जाणले त्यामुळे त्यांनी समाजाला शिक्षण देणे त्यांचा अंधकार दूर करणे अतिशय महत्त्वाचे आहे हे समजून त्यांना ज्ञानी बनवण्याचा सखोलात्मक प्रयत्न केला भगवद्गीता या महान व पवित्र ग्रंथाच्या संस्कृत मध्ये असलेला हा ग्रंथ त्या कालावधीतील समाजाला वाचता येत नसल्याने या ग्रंथाला मराठीमध्ये प्रथम करण्याचा आदेश संत निवृत्तीनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना दिला व संत ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत गीतेचे मराठीमध्ये पृथक्करण केले व सर्व स्तरातील वर्गांना मराठी भाषा समजेल उमजेल असे मराठी मध्ये ज्ञानेश्वरी हा महान व पवित्र ग्रंथ निर्माण केला यामध्ये ध्यान योग भक्त योग व कर्मयोग याचे महत्त्व मराठी मध्ये विशद केले अनाथांना सनाथ केले. मोक्ष प्राप्ती कशी करावी याचे ज्ञान उपलब्ध करून दिले व हजारोंना मोक्षाकडे नेले. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याकरिता माऊलींनी आपले आयुष्य खर्च केले भागवत धर्माचे आचरण करून कोणीही ईश्वर प्राप्ती करू शकतो याची बीज माऊलींनी समाजामध्ये रोवले संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्व ज्ञानेश्वरी हा व अमृतानुभव या दोन महान व पवित्र ग्रंथाची निर्मिती नेवासे नगरी येथे पैज खांबाला टेकून केले मराठी वाड्मयामध्ये अखिल विश्वाचे लक्ष या दोन पवित्र ग्रंथाकडे वेधले गेले संत ज्ञानेश्वर माऊली यांनी 28 अभंगाचा हरिपाठ 9 ओव्यांचे  पसायदान, चांगदेव पासष्टी यांची निर्मिती केली व संपूर्ण विश्वाला महान व पवित्र ज्ञान देण्याचे कार्य केले.
           या महान व पवित्र कार्याची निर्मिती करत असताना संत ज्ञानेश्वर माऊली यांचे माता पिता श्री विठ्ठल पंत कुलकर्णी व माता सौ रुक्मिणी यांचे अभूतपूर्व योगदान बाबत सविस्तर माहिती विशद करण्यात आली. इसवी सन 1296 मध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांनी इंद्रायणी काठी देवाची आळंदी येथे संजीवन समाधी घेतली व माऊली यांनी समाधी घेतल्यानंतर पुढील एक वर्षभराच्या कालावधीमध्ये इसवी सन 1297 मध्ये संत निवृत्तीनाथ संत सोपान देव व संत मुक्ताई यांनीही समाधी घेतल्या. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी संजीवन समाधी घेऊन 750 वर्ष पूर्ण झालेली आहेत सप्तशत्कोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्म जयंती वर्ष साजरे करण्यात आले आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांचे ज्ञान आजही अखिल मानव जातीला महाऊर्जेचे अखंडित प्रेरणास्त्रोत बनले आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत हे ज्ञान आघात शक्ती आघात ज्ञान समाजाला प्रेरणादायी राहणार आहे याची प्रचिती येते. ज्ञानेश्वरी मधील ज्ञान आणि विज्ञानातील ज्ञान याचा संगम होऊन त्याचे जीवनामध्ये आत्मसात करण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
       सदर कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षा एडवोकेट श्रीमती सुमित्रा ताई घाडगे पाटील व प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सोपान काळे,  उप प्राचार्य व सर्व शिक्षक , प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.