रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य दीपस्तंभ प्रमाणे-दत्तात्रय वारकड

अहिल्यानगर -कर्मवीर भाऊराव पाटलांनी अनवाणी पायाने वणवन हिंडून तन-मन-धन सर्वस्व समर्पित करून तत्कालीन समाज सुधारक व काही दानशूर व्यक्तींच्या साह्याने रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली.त्या कालावधीत समाजामध्ये अन्याय,अत्याचार, स्पृश्य-अस्पृश्य भेद समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता.समाजामध्ये निरक्षरता होती.याचे एकमेव कारण अज्ञान होते.म्हणून बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे.हे अण्णांनी जाणले व रयत शिक्षण संस्थेचे बीज समाजामध्ये रोवले.अण्णांचे कार्य हे दीपस्तंभ प्रमाणे आहे.या महान सेवाभावी कार्यामध्ये त्यांची पत्नी सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे अमूल्य योगदान लाभले.
शिक्षण महर्षी पद्मभूषण युगप्रवर्तक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य दीपस्तंभ प्रमाणे आहे. असे प्रतिपादन लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केले आहे.

रयत शिक्षण संस्थेचे अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केडगाव येथे रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी "शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदान" या विषयावर लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांचे व्याख्यान संपन्न झाले.विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस व सन्मानपत्र  देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य श्री नवनाथ बोडखे, उपमुख्याध्मुयापक मुरुमकर एस एस.,निवृत्त शिक्षक श्री महांडुळे, लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड ,शिवाजीराव भोर माजी सचिव रयत शिक्षण संस्था  सातारा ,गुरुकुल प्रमुख दत्तात्रय लांडे,  श्रीम.सुंबे,रावसाहेब सातपुते आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना वारकड म्हणाले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारसरणीचा अण्णा वरती मोठा प्रभाव पडलेला होता त्या कालावधीमध्ये सर्वांना शिक्षण हे शक्तीचे झाले पाहिजे या विचारधारेचे महत्त्वपूर्ण कार्य अण्णांनी पुढे चालू ठेवले. 
बहुजन समाजामध्ये सामाजिक समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे निर्माण करण्याकरिता अण्णांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला व त्यात मोठी वैचारिक क्रांती घडवून आणली.कमवा व शिका हे त्यांचे ब्रीद होते.रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष हे ठेवण्यात आले.4 ऑक्टोबर 1919 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर सातारा जिल्ह्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना अण्णांनी केली. या संस्थेला 106 वर्ष पूर्ण होत आहे.रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिन सर्वत्र आनंदाने साजरा होत आहे.

सूत्र संचालन श्रीम.भोस यांनी केले.तर जे.डी.आभार सौ चोभे एस.एस.यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.