*शेतकरी संघटना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलपिंपळगाव जि. प. गटासाठी बैठक संपन्न*

*शेतकरी संघटना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलपिंपळगाव जि. प. गटासाठी बैठक संपन्न*
   
📍 *बेलपिंपळगाव गटातून उपसरपंच बंडू नाना चौगुले यांचे नाव शेतकरी संघटनेकडून आघाडीवर*
 
*बेलपिंपळगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार उपसरपंच बंडू नाना चौगुले, बाबळेश्वर दूध संघाचे संचालक वसंत काका शेरकर, श्री हनुमान सोसायटीचे माजी चेअरमन संभाजी राजे शिंदे, शिवाजीराव कांगुणे पाटील, भाऊराव तऱ्हाळ आदी.*
नेवासा : नेवासा तालुक्यातील क्रांतिकारी गट म्हणून बेलपिंपळगाव गट ओळखला जातो. 
    बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिला उमेदवार तर बेलपिंपळगाव गणासाठी एस. टी. प्रवर्गातील महिला, सलाबातपूर गणासाठी ओ. बी. सी. महिला आरक्षण आरक्षित आहे. विधानसभेला शेतकरी संघटनेने महायुती उमेदवार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना समर्थन दिले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करिता युती मध्ये शेतकरी संघटनेला प्रतिनिधित्व दिले नाही तर बेलपिंपळगाव गटा सह सर्व जागा व नेवासा नगरपंचायत निवडणूक शेतकरी संघटना लढण्याची शक्यता आहे.
     या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उप अध्यक्ष हरिआप्पा तुवर, बैठकीचे अध्यक्ष सरोदे पाटील, उपसरपंच बंडू चौगुले, तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे, युवक तालुका अध्यक्ष डॉ. कुलकर्णी, उप अध्यक्ष नागोडे पाटील, धर्मरक्षक गणेश चौगुले, संदीप भाऊ लष्करे, बाबासाहेब रोटे, पत्रकार विलास धनवटे, मुमताजभाई सय्यद, बभाळेश्वर दुध संघांचे वसंतकाका शेरकर, कार्लस साठे सर, गंगाधर चौगुले, कैलास शिंदे, आदी मोठ्या संख्येने उपस्तित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.