शिंदे मॅटर्निटी सोनोग्राफी हॉस्पिटल सोनपेठ येथे अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वी

*शिंदे मॅटर्निटी सोनोग्राफी हॉस्पिटल सोनपेठ येथे अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वी*
 *सोनपेठ:प्रतिनिधी आशिष मुंढे*

सोनपेठ तालुक्यातील शिंदे सोनोग्राफी सेंटर रुग्णालयात दि.१५-१०-२५ रोजी सायंकाळी युवक सुनील राधाकिसन वाघमारे 23 वर्षीय युवक हे उपचारासाठी रुग्णालयात आले होते. पोटात दुखत असल्याने त्यांनी सोनपेठ शहरात शिंदे मंटर्निटी हॉस्पिटल येथे त्याची सोनोग्राफी केल्यानंतर, त्यांच्या रिपोर्टमध्ये अपेडीक्स चे इन्फेक्शन झाले आहे असे रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट डॉ अजित शिंदे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना कळविले. इन्फेक्शन मध्ये लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागते, त्यामुळे रुग्ण शिंदे हॉस्पिटल येथे ऍडमिट झाला होता. डॉक्टर अमोल चव्हाण व डॉ.श्रद्धा अजित शिंदे यांनी प्रथमोपचार देऊन सकाळी पेशंटला ऑपरेशन साठी तयार केले. ठरल्याप्रमाणे सकाळी डॉक्टर कपिल पाटील सर्जन, डॉ. श्रीकांत वांगीकर भुलतज्ञ, डॉ. श्रद्धा शिंदे स्त्री रोग तज्ञ, यांनी रुग्णावर यशस्वीरित्या ऑपरेशन केले. रुग्ण युवकाची प्रकृती स्थिर आहे. या ऑपरेशन दरम्यान डॉ सौरभ कुसुमकर, नाथराव चंदेल, यांनी मदत केली. त्यानंतर डॉ.श्रद्धा शिंदे व डॉक्टर अजित शिंदे यांनी दिलेले माहितीनुसार आता सोनपेठ मध्ये नॉर्मल डिलिव्हरी, सिजर, गर्भपिशवी काढणे, कुटुंब नियोजन असे स्त्रीरोग संदर्भातील सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांची छत्रपती संभाजीनगर,परभणी, नांदेड,लातूर, अंबाजोगाई, परळी येथे पळापळ होणार नाही असे सांगितले. तसेच हर्निया, अपेंडिक्स असे सर्व ऑपरेशन रुग्णालयात होतील असे सांगण्यात आले. सोनपेठ शहरात वैद्यकीय क्रांतीचे हे पाऊल महत्त्वाचे आहे. आता गरोदर मातांना डिलीव्हरी व सोनोग्राफी साठी पळापळ ची गरज पडणार नाही. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी व ऑपरेशन योग्य दरात करून देण्याची डॉ. हमी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.