परिवर्तीनी एकादशी निमित्ताने गोणेगाव चौफुला येथे आयोजित किर्तन सोहळयाला भाविकांची गर्दी
नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील रामकृष्ण आश्रमामध्ये एकनाथी भागवत पारायण सोहळयाच्या निमित्ताने भाद्रपद शुद्ध परिवर्तिनी एकादशी व वैकुंठवाशी हभप गंगाधर महाराज जंगले यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र वेळु येथील हभप संजय महाराज वेळूकर यांच्या आयोजित किर्तन सोहळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी वैकुंठवाशी हभप गंगाधर महाराज जंगले यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित संत मंडळींच्या हस्ते करण्यात आले.रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख महंत हरि भक्त परायण भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते उपस्थित संत मंडळींचे संतपूजन करण्यात आले.
यावेळी झालेल्या किर्तन सोहळयाच्या प्रसंगी आश्रमाचे प्रमुख भगवान महाराज जंगले शास्त्री,निलेश महाराज रोडे,गहिनीनाथ महाराज आढाव,सोमेश्वर भारती महाराज, रामगड संस्थानचे महंत श्री बाळकृष्ण महाराज दिघे, हनुमान गडाचे महंत संतोष महाराज चौधरी,चांगदेव महाराज काळे,राम महाराज खरवंडीकर,गणेश महाराज आरगडे,राजेंद्र महाराज आसने,हरि महाराज वाकचौरे, सागर महाराज टेमक,लक्ष्मण महाराज शिरसाठ,बदाम महाराज पठाडे,बाजीराव नाना जाधव, बाळासाहेब महाराज तुवर,देवराम महाराज लांडेवाडीकर,गणेश महाराज गवळी,शेषराव तात्या महाराज,कृष्णा महाराज काकडे,अशोक महाराज बर्डे,सोमनाथ वाफारे, विष्णूपंत ठोसर यांच्यासह विश्वस्त मंडळाचे सदस्य, रामकृष्ण भक्त मंडळाचे सेवेकरी यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
रामकृष्ण आश्रमाचे सेवेकरी बाबासाहेब गंगाधर जंगले (खुपटी) व नंदूभाऊ घावटे यांच्या वतीने फराळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. किर्तन सोहळा संयोजक भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी आभार मानले
प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा