श्री गणरायाची महाआरती वैभव कर्डक यांच्या हस्ते भक्तिभावात संपन्न




श्री गणरायाची महाआरती वैभव कर्डक यांच्या हस्ते भक्तिभावात संपन्न

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी, प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने शिव महाराणा प्रताप चौक, नेवासा फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश महाआरती सकाळची आरती आकाश मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाली व संध्याकाळचा कार्यक्रम आज भक्तिभावात पार पडला.

ही महाआरती वैभव कर्डक यांच्या हस्ते अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली. त्यांची उपस्थिती संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळाच भक्तिमय उत्साह निर्माण करणारी ठरली. “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात परिसर मंगलमय झाला होता.

कार्यक्रमाचे आयोजन शिव महाराणा प्रताप चौकाचे संस्थापक आणि प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख कार्याध्यक्ष रमजान शेख, उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ, राहुल भाऊ जगदाळे, कदम सर, कृष्णा नेमाने, उत्तम विटकर, रोहित डुकरे,माऊली वाघुले, शिवाजी विटकर, दत्तू जाधव, जालू भाऊ पिटेकर, सागर गायकवाड, संभाजी पठाडे, अशोक मामा जाधव, प्रकाश बोर्डे, संदीप सोनवणे, मल्हारराव शिंदे यांच्यासह अनेक गणेशभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक दिवसाचा उत्सव भक्ती, सामाजिक ऐक्य आणि सलोखा याचा सुंदर संगम घडवून आणत आहे. आज संध्याकाळची ही महाआरती गणेशभक्तांसाठी एक अविस्मरणीय भक्तिपर्व ठरली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.