"भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी नाही... अखेर जनतेच्या आवाजाला न्याय!" – ऋषिकेश शेटे पाटील यांच्या संघर्षाला यश
नेवासा प्रतिनिधी.नेवासा तालुक्यातील नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींना अखेर न्याय मिळाला आहे. पुरवठा विभागातील रेशन कार्ड विभागाचा भ्रष्ट अधिकारी डोळस याच्यावर कारवाई करत त्याची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई भाजप जिल्हा उपाध्यक्ष व युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे.
तालुक्यातून अनेक दिवसांपासून या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी येत होत्या – नागरिकांना वेळोवेळी अडवणे, कामात टाळाटाळ करणे, वशिले लावल्याशिवाय काम न होणे, हे प्रकार सर्रास सुरू होते. ही परिस्थिती सामान्य जनतेसाठी अन्यायकारक ठरत होती.
ऋषिकेश शेटे पाटील यांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पाठपुरावा केला आणि अखेर पुरवठा विभागाने संबंधित अधिकारी डोळस याला तातडीने हटवण्याचा निर्णय घेतला.
🎯 "तालुक्यात कुठल्याही कार्यालयात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. असे अधिकारी सापडल्यास नागरिकांनी थेट संपर्क साधावा!" – असा इशाराही शेटे पाटील यांनी दिला आहे.
नेवासा तालुक्यातील हा निर्णय म्हणजे जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेतृत्वाच्या संघर्षाचे यश आहे. ही केवळ सुरुवात आहे – 'रामराज्य' स्थापनेच्या दिशेने एक ठोस पाऊल!