*वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतमध्ये अपंग कल्याण निधीतून पाण्याचे जीआर वाटप*


*वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतमध्ये अपंग कल्याण निधीतून पाण्याचे जीआर वाटप*

 वडाळा प्रतिनिधी.वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत ने अपंग कल्याण निधी अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक पाण्याचा जीआर वाटप करण्यात आले आहे. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या पाच टक्के अंध, अपंग, दिव्यांग कल्याण निधी म्हणून खर्च करण्याची तरतूद आहे, त्यानुसार हा निधी वाटप करण्यात आला आहे. 
. ग्रामपंचायत वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ललित मोटे होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे यांनी नोंदणी केलेल्या अपंग लाभार्थ्यांची माहिती सांगितली.स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. हा निधी दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जात असतो.या निधी वाटप कार्यक्रमाप्रसंगी सरपंच माननीय ललित दादा मोटे पा. उपसरपंच रंजना राऊत , माजी सरपंच बाबासाहेब सुधाकर मोटे तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब मोटे प्रतीक मोटे सचिन विलास मोटे, निखिल मोटे लक्ष्मण मोटे लहुतात्या मोटे विनोद पटेकर विलास वाघमारे बाळासाहेब जामकर विठ्ठल पवार श्रीकांत मोटे राहुल मोटे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मोटे सुरेश पाटीलबा मोटे सुनील पतंगे सागर बहादुरे अशोक कांबळे व लाभार्थी पुरूष महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. दिव्यांग लाभार्थ्यांना जीआर मिळाले म्हणून आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.