मक्तापूर येथे ग्रामसभा घेवून विविध सामाजिक मुद्द्यांवर चर्चा; अनुपस्थित सदस्यांवर नाराजी व्यक्त
प्रतिनिधी – गणेश झगरे, मक्तापूर (नेवासा तालुका):
नेवासा तालुक्यातील मक्तापुर ग्रामपंचायतीच्या वतीने मारुती मंदिर येथे पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये विविध शासकीय कामकाजांसोबतच हुंडाबळी प्रतिबंध, बालविवाह रोखणे, मराठा आरक्षण आणि सामाजिक एकजुटीचे प्रश्न केंद्रस्थानी राहिले.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुशिलाताई लहारे होत्या. ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे यांनी शासकीय कामकाजाचे सविस्तर वाचन केले. यानंतर मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी अनुपस्थित राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांबाबत नाराजी व्यक्त करत, "सर्वसामान्य जनतेने यांना निवडून देणे ही चूक झाली का?" असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या विधानाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा लाभला.
मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनाला व मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षास मक्तापुर ग्रामस्थ, सकल मराठा समाज व जय श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला.
ग्रामसभेस उपस्थित मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे: सरपंच सौ. सुशिलाताई लहारे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कांगुणे, पोलीस पाटील अनिल लहारे, मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश झगरे, आजिनाथ झगरे, राहुल जामदार, देवीदास साळवे, प्रदीप साळवे, रोहित जामदार, नेवासा मार्केट कमिटी संचालक भरत काळे, नामदेव कराडे, किरण सातपुते, अनिल गोरे, उपसरपंच अलकाताई साळवे, प्रदीप बर्डे, विलास साळवे, जालिंदर जामदार, मछिंद्र जामदार, आंबादास कांगुणे, कल्पनाताई कोळेकर, जोबदास साळवे, अमोल भागवत यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करत सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला.
---