खासदार लंके यांनी रासने कुटुंबीयांची घेतली सांत्वन भेट
नेवासा प्रतिनिधी .नेवासा शहरात कालिका फर्निचरला लागलेल्या आगीत कालिका फर्निचर चे मालक व त्यांचे कुटुंब यांचा मृत्यू झाला त्याप्रसंगी काल खासदार लंके यांनी रासने कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली नेवासा शहरात काही दिवसापूर्वी कालिका फर्निचरला आग लागून यामध्ये कालिका फर्निचर चे मालक व त्यांची पत्नी व दोन मुले आजी अशा पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे या घटनेचे नेवासा तालुक्यात शोककळा पसरली तर मयूर रासने यांचे वडील व आई यांच्यावर मोठा आघात झाला या घटनेमुळे विविध क्षेत्रातील पदाधिकारी राजकीय नेते यांनी रासने कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आज नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी रासने कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले यावेळी खासदार निलेश लंके व त्यांचा परिवार रासने कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे पुढील काळात योग्य ती मदत सहकार्य कायम रासने कुटुंबीयांना राहील अशी ग्वाही लंके यांनी दिली यावेळी लंके यांच्यासोबत सतीश थोरात योगेश गायकवाड गणेश चौथे प्रकाश साळवे केतन काळे अंजुम पटेल संभाजी माळवदे इरफान शेख इम्रान पटेल सुलेमान मणियार शरीफ पठाण शादाब तांबोळी किरण घोडके शाहिद पठाण आकाश हिवाळे अनिकेत साठे अनिकेत मापरी स्वप्निल मापारी आदींसह नेवासा शहरातील नागरिक उपस्थित होते