भिमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे नेवासा पोलिस निरीक्षक महेश पाटील यांचा सत्कार
नेवासा (प्रतिनिधी) :
आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तसेच नेवासा काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा सौ. शोभाताई पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेवासा तालुक्यातील भिमशक्ती संघटनेच्या महिला व पदाधिकाऱ्यांनी नेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
तालुका अध्यक्षा सौ. आरती अविनाश पुलगम यांच्यासह भिमशक्तीच्या अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांवरील अन्याय, अत्याचार, अडचणी व तक्रारींबाबत पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे, असा आग्रह या वेळी महिला प्रतिनिधींनी व्यक्त केला.
या प्रसंगी निरीक्षक पाटील साहेब म्हणाले, "रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा होत आहे. एक भाऊ म्हणून, तसेच कायद्याच्या चौकटीत राहून, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे." त्यांच्या या आश्वासनाने उपस्थित महिलांना दिलासा मिळाला.
महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या भिमशक्ती संघटनेच्या सामाजिक जाणीवेचा प्रत्यय आला. उपस्थित सर्व महिलांनी पाटील साहेबांचे आभार मानले.
--