आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा नेवासा फाट्यावर संघर्षशील दौरा!
नेवासा फाटा (ता. नेवासा) – आत्महत्या केलेल्या शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ विचारवंत आणि नेते ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या नेवासा फाटा येथे येणार आहेत. ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही केवळ एक शोकांतिक घटना नसून शासनाच्या अपयशी धोरणांचा क्रूर परिणाम आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या या दौऱ्याला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ते शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथेला आवाज देणार आहेत.
यासोबतच संपूर्ण कर्जमाफीसाठी आक्रमक पावले उचलण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला असून, शासनाच्या झोपेत असलेल्या यंत्रणेला जाग आणण्यासाठी संघर्ष उभारण्याचे संकेत दिले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली उद्या नेवासा फाट्यावर प्रबळ आवाज उठवला जाणार आहे. शेतकऱ्यांचा जीव ही केवळ बातमी नसून, ती एक आग आहे – आणि ही आग आंबेडकरी आंदोलनाच्या रूपात पेटण्यास सज्ज झाली आहे!