शेतकरी अभ्यास दौरा दुबईत अब्दुल शेख यांची उपस्थिती.
दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या शेती अभ्यास व विदेश व्यापार दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. या दौऱ्यातून प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून “कैट विला फार्मर प्रोड्यूसर कंपनी” या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे.
या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार असून, शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळावा, गटशेतीला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
नेवासा मतदारसंघातील शेतकरी बांधवांसाठी देखील लवकरच गटशेती कार्यशाळा व विदेश व्यापार अभ्यास कार्यशाळा आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याद्वारे शेतकऱ्यांना नवीन संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान व निर्यात व्यापार याबाबत थेट माहिती देऊन त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडले जाणार आहे.
या उपक्रमात अब्दुल भैय्या शेख
युवा नेते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,मयूर पटवा, निलेश गोडसे, प्रगतशील शेतकरी रवी थोरात, दीपेश मुळे, विनायक मुळे, पीयूष खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.